केश प्रत्यारोपण: नेमकी प्रक्रिया आणि त्यातील विश्वासार्हता
केसगळतीची समस्या भेडसावत असलेल्या आपण सर्वांनीच वेगवेगळे पर्याय आजमावून पाहिले आहेत. कधी मित्राने सांगितलेले आयुर्वेदिक औषध, तर कधी आपल्या केशभूषाकाराने सांगितलेली महागडी क्रीम किंवा हेअर स्पाचा पर्याय. पण, अपेक्षित आणि समाधानकारक परिणाम न मिळाल्याने उपाय कमी आणि फक्त नैराश्य हातात पडते.
अशा परिस्थितीतच आपण केस प्रत्यारोपणाचा विचार करतो. पण, शस्त्रक्रिया म्हटली की काहीतरी होण्याची भीती आणि जास्त पैसे घालण्याची चिंता दोन्ही सतावू लागते जी साहजिक आहे.
या लेखामध्ये आपण नेमकी केश प्रत्यारोपण प्रक्रिया कशी होते, तिचा आरोग्यावर होणार परिणाम आणि त्याच्या तांत्रिक बाबी काय हे जाणून घेणार आहोत.
केस प्रत्यारोपण प्रक्रियेचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात. १) एफयुटी २) एफयुई ३) प्रगत एफयुई.
हे प्रकार आपल्या शरीरावरील इतर भागातील केस 'कशाप्रकारे' काढून टक्कल पडलेल्या जागी बसवले जातील यानुसार ठरतात. यापैकी एफयुई ही सध्या सर्वात जास्त वापरली जाणारी आणि सर्वात सुरक्षित पद्धत आहे. प्रगत एफयुई सध्या प्रायोगिक तत्वावर वापरली जाते तर एफयुटी ही ठराविक परिस्थितीत तज्ञांद्वारे सुचवली जाते.
आपण एफयुई प्रक्रियेच्या माध्यमातून नेमके केस प्रत्यारोपण कसे करतात समजून घेऊ. आपल्या डोक्यावरील बाजूचे केस हे सर्वात जास्त घनदाट आणि न गळणारे असतात. या केसांवर आपल्या आनुवंशिकतेचा आणि हार्मोन्सचा परिणाम सर्वात कमी होत असल्यामुळे हे केस सहसा गळत नाहीत. एफयुई प्रक्रियांमध्ये शक्यतो या भागातील केस काढून त्यांचे टक्कल पडलेल्या भागी प्रत्यारोपण केले जाते. जर या ठिकाणचे केस विरळ असतील तर शरीरावरील इतर भागाचे (डोनर एरियाचे) केस वापरले जातात. कोणत्याही प्रकारची कसर शस्त्रक्रियेमध्ये राहू नये म्हणून आपली मेडिकल हिस्ट्री आणि आपल्या अपेक्षा यांची पूर्ण चौकशी तज्ञ सल्लागारांद्वारे केली जाते. या प्रक्रियेदरम्यान कोणतीही इजा अथवा वेदना होत नाही. ही सर्व प्रक्रिया सूक्ष्यदर्शीचा वापर करून होत असल्याने, तज्ञ हे काम खूप कमी वेळात आणि अत्यंत सुंदर पद्धतीने करतात. एफयुई प्रक्रियेची सर्वात जमेची बाजू म्हणजे ही प्रक्रिया एका दिवसात पूर्ण होते. प्रत्यारोपणासाठी आलेली व्यक्ती अगदी ज्या दिवशी प्रत्यारोपण झाले त्यादिवशी तिचे काम सुरु करू शकते.
मुंबई स्थित मिराज क्लिनिक हे या प्रक्रियेतील नावाजलेले आणि विश्वासार्ह नाव आहे. त्यांच्या कामाचा दर्जा, प्रगतता आणि समाधानी ग्राहकांची संख्या याची दखल अनेक मान्यवरांनी घेतलेली आहे. आपण जरूर तेथील तज्ञांना भेट देऊन एकदा चर्चा करावी. आपल्या नवीन आकर्षक लूकसाठी शुभेच्छा.
Comments
Post a Comment